सराईत दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; ११ गाड्या हस्तगत, मोठ्या रॅकेटचा संशय
नवी मुंबईच्या पनवेल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचा सुळसुळाट; गुन्हे शाखेची कारवाई
नवी मुंबई (मंगेश जाधव) – पनवेल रेल्वे परिसरासह इतर विभागांमधून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा कक्ष (२) पनवेल यांनी तपास सुरू केला होता.
तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांना कळाले की संशयित चोरटा पळस्पे परिसरात आहे. पोलिसांनी तेथे सापळा रचून आदित्य ठाकुर या सराईत गुन्हेगाराला अटक केली. चौकशीत त्याच्याकडून ११ चोरीच्या दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
या गुन्ह्यांमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरु आहे.
#नवीमुंबई #पनवेल #दुचाकीचोरी #पोलीसकारवाई #AdityaThakur #BikeTheft #CrimeNews