कल्याणमध्ये शिवराय, फुले, आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात
महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणि अत्रे रंगमंदिरात दोन दिवसीय कार्यक्रम; उद्घाटन आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते
बातमी – मंगेश जाधव
कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.) व जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन २९ व ३० एप्रिल २०२५ रोजी कल्याण पश्चिम येथील महानगरपालिका मुख्यालय आणि अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले.
२९ एप्रिल रोजी महोत्सवाचे पहिले सत्र आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटित झाले. यावेळी माजी महापौर रमेश जाधव विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस विजय सरकटे यांनी केले.
पहिल्या दिवशी उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन झाले. त्यानंतर अरुण हिवाळे आणि माया ब्लड बँक बदलापूर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर पार पडले, ज्याचे उद्घाटन उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते झाले.
सायंकाळी संविधान महोत्सव समिती पनवेलच्या वतीने चित्रप्रदर्शन व संविधान कलादालनाचे उद्घाटन शहर अभियंता अनिता परदेशी यांनी केले. ‘व्यसनमुक्ती : काळाची गरज’ या विषयावर चित्रप्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी उपायुक्त अतुल पाटील प्रमुख उपस्थित होते. अल्कोहोलिक अॅनॉनिमस, कल्याण संस्थेचा सहभागही यामध्ये होता.
३० एप्रिल रोजी दुसऱ्या सत्रात देशभक्तीपर व महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित नृत्य स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी उपयुक्त वंदना गुळवे असतील.
छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर या प्रमुख वक्त्या असतील तर कल्याण तहसीलदार सचिन शेजाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सूत्रसंचालन समाधान मोरे करतील.
कार्यक्रमाच्या समारोपाला शितल भंडारे व संच यांचा शाहिरी जलसा व प्रबोधन कला मंच सादर होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
हॅशटॅग्स:
#KalyanNews #JointJayanti2025 #ShivJayanti #PhuleJayanti #AmbedkarJayanti #ConstitutionFestival #KDMCEvents #BahujanEmpowerment

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators