भारती तायशेटे यांना ‘नॅशनल अवॉर्ड्स गोवा’त आदर्श शिक्षिका पुरस्कार
रत्नागिरीच्या पूर्णगड शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय सन्मान; शैक्षणिक क्षेत्रात गौरव
रत्नागिरी जिल्ह्यातील जि.प. शाळा, पूर्णगड नं.१ या शाळेच्या पदवीधर शिक्षिका आणि मुख्याध्यापिका श्रीम. भारती तायशेटे यांना नॅशनल अवॉर्ड्स गोवा अंतर्गत ‘आदर्श शिक्षिका राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गोवा गव्हर्मेंट PWD स्टाफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड (गोवा), इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (बेळगावी) आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (बेळगावी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्याचा भव्य आयोजन गोवा येथे करण्यात आले.
या पुरस्कारासाठी दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड होते. भारती तायशेटे यांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल पूर्णगड ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करत भरभरून गौरव केला. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेत राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न प्रशंसनीय ठरले आहेत.
या यशामध्ये त्यांचे सहकारी शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, त्यांचे पती विजय जाधव सर यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. कासार साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. शिरभाते मॅडम, कडव साहेब, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रा. एस.जे. मुरकुटे, पावस बीटच्या सायली सावंत (माजी), सशाली मोहिते, हिरवे मॅडम, माजी केंद्रप्रमुख दीपक गुरव, उल्हास पाटील आणि सध्याचे केंद्रप्रमुख संजय राणे यांनीही या यशाबद्दल तायशेटे यांचे विशेष अभिनंदन केले.
हॅशटॅग्स:
#RatnagiriNews #AdarshShikshika #BharatiTayashete #ZPSchoolPoornagad #NationalAwardGoa #KonkanPride #EducationNews #TeachersOfIndia

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators