राजापूर शहरात बजरंग दल शौर्य प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न
हिंदू तरुणांमध्ये संघटन व शारीरिक कणखरता निर्माण करण्याच्या उद्देशाने राजापूर संघ कार्यालयात वर्गाचे आयोजन
बातमी – मंगेश जाधव
राजापूर | प्रतिनिधी – विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल आयाम दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने राजापूर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात १५ ते ३५ वयोगटातील तरुणांसाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणाला राजापूर तालुका व दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन बजरंग दल रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभाग संयोजक प्रसादजी ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व श्रीराम पंचायतन व भारतमाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. नंतर छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निकेश पांचाळ, अद्वैत अभ्यंकर, अभिजित पवार, राजू मोरे, संदीप मसूरकर, संदेश टिळेकर, अभिजित नार्वेकर, दिलीप गोखले, प्रकाश खानविलकर उपस्थित होते.
या प्रशिक्षण वर्गामागचा उद्देश म्हणजे नव्याने सुरू झालेल्या बजरंग दलाच्या कार्यामध्ये तरुणांना ओढणे, त्यांच्यात संघटन घडवणे, आणि त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे. यासाठी मैदानावर दंड, यष्टी, खेळ, सूर्यनमस्कार अशा शारीरिक क्रियांचा सराव घेण्यात आला.
या वेळी विश्व हिंदू परिषद रत्नागिरी विभाग संयोजक प्रसादजी ठाकूर, जिल्हा मंत्री कुमारजी जोगळेकर, सामाजिक समरसता प्रमुख संदेश टिळेकर, तालुका संयोजक निकेश पांचाळ, अभिषेक पवार, राजू मोरे, अद्वैत अभ्यंकर, संघचालक राजेंद्र कुशे, सुशांत बाकाळकर, जगदीश पांचाळ, प्रशांत लिंगायत, प्रशांत विचारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी कुमारजी जोगळेकर यांनी बजरंग दल “सेवा, सुरक्षा आणि संस्कार” या त्रिसूत्रीवर काम करत असून, हिंदू तरुणांमध्ये संघटन उभं करण्याचं काम करत असल्याचे सांगितले. या वर्गातून सक्षम कार्यकर्ते घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष महेशजी मयेकर व मंदार बावधनकर यांनीही प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. या उपक्रमात राष्ट्र सेविका समिती व राजापूर शहरातील महिलांनी पोळ्या देऊन मोलाचे सहकार्य केले.
रत्नागिरी जिल्हा व राजापूर तालुक्यातील विविध भागांतून आलेले हिंदू तरुण या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते.
हॅशटॅग्स:
#बजरंगदल #शौर्यप्रशिक्षणवर्ग #राजापूर #विश्वहिंदूपरिषद #संघटन #हिंदुत्व #रत्नागिरी