राजकीय श्रेयासाठी सामाजिक कामांचा वापर नको – पराग कांबळे यांची स्पष्ट भूमिका
गुहागर आगारात नवीन बसगाड्यांचे आगमन जनतेसाठी महत्त्वाचे, राजकीय श्रेय लाटण्याचे प्रकार टाळा – प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांचे प्रतिपादन
आबलोली (संदेश कदम):
गुहागर आगारात नवीन बसगाड्यांचे आगमन हे प्रवाशांसाठी मोठे सुखद पाऊल आहे. या कामासाठी स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी दिलेले सहकार्य लक्षणीय आहे, मात्र अशा सामाजिक हिताच्या उपक्रमांचे राजकीय भांडवल कोणी करू नये, असे परखड मत प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पराग कांबळे म्हणाले की, “गुहागर आगारप्रमुख व अधिकारी चांगले काम करत आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी वेळोवेळी पत्रव्यवहार करून आवश्यक गाड्यांची मागणी करत आलो आहोत. आमदार जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे नव्या गाड्या आल्या व त्यांचे लोकार्पण झाले. त्याबद्दल आम्ही आभार मानतो, पण काहीजण या उपक्रमाचे श्रेय स्वतःकडे खेचत आहेत, हे दुर्दैवी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “गुहागरच्या विकासासाठी आम्ही ‘बिगर राजकीय फोरम’ ची संकल्पना मांडली आहे. विकासासाठी लॉबींग पॉलिटिक्सला चाप लावणे गरजेचे आहे. राजकारण फक्त निवडणुकीपुरते ठीक आहे, पण काही लोक बारा महिने राजकारणात गुंतलेले असतात, ही खंत वाटते.”
गुहागरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध जनहिताच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल
#गुहागर #एसटीबस #परागकांबळे #भास्करजाधव #नवीनबससेवा #प्रवासीहित #राजकारण #RatnagiriNews