रत्नागिरीत संविधान प्रेमी नागरिकांकडून पहलगाममधील पर्यटकांना मेणबत्ती श्रद्धांजली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीत संविधान प्रेमी नागरिकांकडून पहलगाममधील पर्यटकांना मेणबत्ती श्रद्धांजली

 

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७ निष्पाप पर्यटकांना २७ दिवस मेणबत्ती लावून अभिवादन; जयस्तंभ परिसरात संध्याकाळी कार्यक्रम

 

रत्नागिरी – वार्ताहर 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत रत्नागिरीतील संविधान प्रेमी नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या मध्यवर्ती ठिकाणी दररोज संध्याकाळी मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

 

हा उपक्रम सलग २७ दिवस म्हणजेच दिनांक २० मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमामध्ये दीपक राऊत, बशीर मुर्तुजा, संजय वैशंपायन, काका तोडणकर, अस्लम शेख, सत्तार मुल्ला, सुरेश ओसवाल, भैय्या वनजु, संकेत कदम यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.

 

दहशतवाद्यांनी देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव रचला असला तरी भारतीय संविधानावर निष्ठा असलेले नागरिक त्यांच्या हेतूंना यशस्वी होऊ देणार नाहीत, असा ठाम विश्वास बशीर मुर्तुजांनी व्यक्त केला. या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचं मतही कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलं.

 

हॅशटॅग्स:

#Ratnagiri #PahalgamAttack #TributeToTourists #CandleMarch #संविधानप्रेमी #दहशतवादाचा निषेध #RatnagiriNews

 

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...