पनवेल शहर पोलिसांकडून महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि गस्त
पळस्पे उड्डाणपुलाखाली वाहन तपासणी; शहराच्या प्रमुख भागांमध्ये पायी गस्त
नवी मुंबई (मंगेश जाधव)
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी व पायी गस्त मोहीम राबवण्यात आली.
पळस्पे उड्डाण पुलाखाली दोन अधिकारी आणि सात अंमलदारांच्या उपस्थितीत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी ३० वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पायी गस्ती पथकाने पळस्पे पोलिस चौकी, पारपुंड गाव ओएनजीसी, शिवशंभो नाका, तक्का, रेल्वे स्टेशन, ओरियन मॉल परिसर, लाईन आळी, वडाळे तलाव ते पोलिस ठाणे अशा प्रमुख ठिकाणी गस्त घातली. या गस्ती पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह २ पोलिस निरीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ अंमलदार सहभागी झाले होते.
हॅशटॅग्स:
#पनवेलपोलिस #महाराष्ट्रदिन #नाकाबंदी #गस्तमोहीम #शहरसुरक्षा #NaviMumbaiNews
फोटो