साडवलीच्या मीनाताई ठाकरे सायन्स कॉलेजचा शंभर टक्के निकाल!
कु. तन्वी पाध्ये कॉलेजमध्ये प्रथम; एकूण ४८ पैकी १० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ. मीनाताई ठाकरे सायन्स ज्युनिअर कॉलेज साडवलीचा निकाल यंदा १०० टक्के लागला आहे. कु. तन्वी प्रशांत पाध्ये हिने ६९.५०% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
या यशात कु. तृप्ती चव्हाण, कु. आर्या सावंत, कु. सानिया बेटकर, कु. मनोज राईका, आणि कु. ओम बाईत या विद्यार्थ्यांनी पुढील क्रमांक मिळवत आपली चमक दाखवली आहे.
या वर्षी एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि उर्वरित ३८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थाध्यक्ष रविंद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व मुख्याध्यापक बी. व्ही. नलावडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक व कर्मचारी वर्गांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
—
#साडवली #संगमेश्वर #१००%निकाल #HSC2025 #मीनाताईठाकरेकॉलेज #रत्नागिरीशिक्षण #StudentsSuccess #KonkanNews
फोटो