मुस्लिम महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निशाणा; ऑपरेशन ‘सिंदूर’चा पराक्रम उघड!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार!

मुस्लिम महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निशाणा; ऑपरेशन ‘सिंदूर’चा पराक्रम उघड!

नवी दिल्ली – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. भारतीय लष्कराच्या मुस्लिम महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांनी या धाडसी कारवाईची माहिती दिली. “मोदी है तो मुमकिन है!” हे विधान या वेळी पुन्हा सार्थ ठरल्याचे जाणवत आहे.

२२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. यानंतर रात्री १.०५ ते १.३० या दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयासह ९ ठिकाणांवर लक्ष्यभेदी हल्ले केले. कर्नल कुरैशींनी स्पष्ट केले की, या कारवाईत एकाही निर्दोष नागरिकाला इजा झाली नाही.

मार्च २०२५ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये ४ जवानांची झालेली हत्या आणि मुंबई हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे ट्रेनिंग हेच टार्गेट ठरले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमधील सवाई नाला आणि बहावलपूर येथील कॅम्पवरही हल्ला करण्यात आला.

भारतीय लष्कराच्या या संयमित पण प्रभावी कारवाईमुळे पुन्हा एकदा जगासमोर भारताची ‘नो नॉनसेन्स’ भूमिका अधोरेखित झाली. कर्नल कुरैशी यांचं नेतृत्व आणि स्पष्ट वक्तव्य यामुळे या कारवाईचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे.


#कर्नलसोफियाकुरैशी #ऑपरेशनसिंदूर #भारतविरुद्धदहशतवाद #IndianArmy #ModiHaiToMumkinHai #पहलगामहल्ला #PakistanTerrorTargets

फोटो 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...