साटवली आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी टंचाई; ग्रामस्थांची तातडीच्या भरतीची मागणी
फोन सुविधा बंद, डॉक्टरांचा अभाव, रिक्त पदांची भरती आणि CHO नेमणुकीची जोरदार मागणी
लांजा ( जितेंद्र चव्हाण प्रतिनिधि) तालुक्यातील साटवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) सध्या MBBS श्रेणी-1 डॉक्टर नसल्याने रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. २४ तास सुरू असलेले हे केंद्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणीत आले असून, स्थानिक ग्रामस्थांकडून तातडीने डॉक्टर नेमण्याची मागणी होत आहे.
साटवली येथील जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आयुष्यमान आरोग्य मंदिरात पुरुष शिपाई – ३, सफाई कामगार – १, स्त्री परिचर – १, लॅब टेक्निशियन – १, कनिष्ठ सहाय्यक – १ आणि वाहन चालक – १ ही पदे रिक्त आहेत. तसेच साटवली उपकेंद्रातील आरोग्य सेवकांची २ पदेही भरली गेलेली नाहीत.
अजून गंभीर बाब म्हणजे साटवली आरोग्य केंद्रात संपर्कासाठी वापरण्यात येणारा बीएसएनएल लाईन फोन अनेक दिवसांपासून बंद असून, आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना आरोग्य केंद्राशी संपर्क करणे अशक्य झाले आहे. संबंधित डॉक्टरांनीही फोन बंद असल्याची कबुली दिली आहे. ग्रामस्थांकडून या फोन लाईनला तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तसेच साटवली, खावडी, इंदवटी आणि लांजा येथे CHO (समुदाय आरोग्य अधिकारी) नियुक्त करण्यात यावेत, जेणेकरून NCD (नॉन-कम्युनिकेबल डिजीज) कार्यक्रमांअंतर्गत नागरिकांना वेळेवर उपचार मिळू शकतील. खावडी व इंदवटी कार्यक्षेत्रातील रुग्णांनाही याचा विशेष फायदा होईल.
लांजा उपकेंद्रात आरोग्य सेवक (हिवताप) आणि आरोग्य सेवक (जि.प.) अशी दोन पदे रिक्त आहेत, त्यांची तातडीने भरती करावी, अशीही जोरदार मागणी आहे. वाढत्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमुळे CHO व इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, रिक्त पदे भरली गेल्यास सेवा कार्यक्षम होईल.
हॅशटॅग्स:
#साटवलीआरोग्यकेंद्र #लांजा #RatnagiriNews #आरोग्यसेवा #CHO #डॉक्टरांचीटंचाई #PHCसाटवली #आरोग्यकर्मचारी
फोट