भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट मोड; सागरी सुरक्षा वाढवली
सिंधुदुर्गातील सर्व बंदरांवर बंदोबस्त, रात्री पोलिसांकडून तपासणी आणि नाकाबंदी
बातमी.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकण किनारपट्टीवरही सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. किनारपट्टी भागात पोलिसांकडून रात्री गस्त वाढवण्यात आली असून काही ठिकाणी अचानक नाकाबंदीही करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी, विजयदुर्ग, मालवण, देवगड, निवती, आचरा आणि वेंगुर्ला या महत्त्वाच्या बंदरांवर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९२ लँडिंग पॉइंट्सवर पोलिसांची सतत गस्त सुरू आहे.
सागरी सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून, कोणतीही संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून सागरी सुरक्षादल वाढवले असून अतिरिक्त पोलीस फोर्स देखील तैनात करण्यात आले आहेत.
कोणताही संशयास्पद इसम किंवा वस्तू दिसल्यास नागरिकांनी 112 क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हॅशटॅग्स:
#कोकणअलर्ट #सागरीसुरक्षा #सिंधुदुर्गबंदर #RatnagiriNews #KonkanSecurity #MaritimeAlert #BreakingNews
फोटो