आमदार भास्कर शेठ जाधव यांचे हस्ते गुहागर गिमवी येथे विविध विका
सकामांचे उद्घाटन संपन्न
गुहागर (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील गिमवी गावात रस्ते, पूल, बंधारा अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. स्थानिक विकासासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली असून, लवकरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, “गुहागर मतदारसंघातील दूरवरच्या आणि दुर्गम भागात विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. गिमवी गावातील ही विकासकामे गावाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना देतील. रस्ते आणि पूल या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यास नागरिकांना दळणवळणाची आणि रोजगाराची अधिक संधी उपलब्ध होतील.”
या उद्घाटन सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, ज्येष्ठ सहकारी विनायक मुळे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच गिमवी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदार जाधव यांचे विशेष आभार मानले आणि त्यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन स्थानिक शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले. कामांची सुरुवात लवकरच होणार असून नियोजित वेळेत ती पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे