महापुरुषांच्या विचारांचा जागर!
दादर नायगाव येथे संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न
भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई | मंगेश जाधव
दादर (नायगाव) येथे २७ एप्रिल ते ४ मे २०२५ दरम्यान जे.पी. स्पोर्ट्स क्लब, ज्योतिबा रहिवाशी संघ, जयंती उत्सव मंडळ आणि बौद्धजन पंचायत समिती शा. क्र. ५७९ यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
या महोत्सवात भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. विविध वयोगटातील नागरिकांसाठी निबंध, चित्रकला, नृत्यकला, पाककला, वेशभूषा, मैदानी खेळ तसेच होम मिनिस्टर स्पर्धा, लकी ड्रॉ व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या सर्व स्पर्धांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डॉ. राजू वाघमारे, बंटी बाफना, अजित मोरे, गजेंद्र धुमाळे यांच्या सौजन्याने विविध उपक्रम रंगले, तर सौ. आशा ढोबळे यांनी शकुंतला व पांडुरंग साळवी यांच्या स्मरणार्थ भोजनदान केले.
विशेष आकर्षण ठरले ते कुमार अरहंत किरण जाधव या १० वर्षीय विद्यार्थ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत. कार्यक्रमात स्थानिक आमदार मा. श्री. काळिदास कोळंबकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गिनीज बुकमधील नोंद, भिमज्योत व प्रसूतीगृहाच्या नामांतराच्या मागण्या, तसेच पुनर्विकासाच्या आश्वासनाने उपस्थितांना दिलासा मिळाला.
या कार्यक्रमाला मा. नगरसेवक सुनील मोरे, संदीप पानसांडे, गजेंद्र धुमाळे, ऍड. प्रशांत दिवटे, ऍड. मनोज टपाल, काजल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाखाध्यक्ष राहुल गजानन अहिरे यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. रेखा कांबळे, सौ. ज्योती तांबे, सौ. सुप्रिया शिंदे, सौ. अश्विनी शिंदे, सौ. लिलावती शिर्के, सौ. दामिनी तांबे, सौ. किरण अहिरे, तसेच निलेश साळवी, सुदर्शन मयेकर, रोहित तांबे, राहुल अहिरे, तुषार सावंत, संतोष साळवी यांनी अथक परिश्रम घेतले.
—
#दादरनायगाव #संयुक्तजयंती #भगवानबुद्ध #शिवाजीमहाराज #महात्माफुले #बाबासाहेबआंबेडकर #महापुरुषजयंती #समाजप्रबोधन #नवीनमुंबई
फोटो