बसफेऱ्या रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक; राजेंद्र भुरण यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बसफेऱ्या रद्द होण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक; राजेंद्र भुरण यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

बस सेवा नियमित करण्यासाठी बदली निकष नियमानुसार करण्याचीही मागणी

रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस राजेंद्र भुरण यांनी रत्नागिरी परिवहन विभागात चालक व वाहकांची कमतरता असल्यामुळे सातत्याने बसफेऱ्या रद्द केल्या जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि परिवहन व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे लिखित निवेदनाद्वारे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

श्री. भुरण यांनी स्पष्टपणे सांगितले की, बसफेऱ्या रद्द झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, आजारी रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यांनी बदली प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करण्यावर भर देत, कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन नागरिकांचा विश्वास टिकून राहील, असेही त्यांनी नमूद केले.


#रत्नागिरी #एसटीबसफेऱ्या #परिवहनविभाग #राजेंद्रभुरण #काँग्रेसरत्नागिरी #उदयसामंत #प्रतापसरनाईक #बससेवा

फोटो

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...