देवडे(संगमेश्वर) येथे दि. १५,१६,१७ मे रोजी महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन
सामाजिक,धार्मिक,क्रिडा आणि
शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन
देवडे भीमज्योत हितवर्धक सेवा संघ मुंबई – ग्रामीण संस्थेचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव -२०२५ देवडे, ता. संगमेश्वर ( व्हाया, साखरपा) येथे देवडे भीमज्योत हितवर्धक सेवा संघ, मुंबई/ ग्रामीण आणि संघमित्रा महिला मंडळ ,देवडे आयोजित बहुजन नायकांच्या जयंती प्रित्यर्थ भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ मे ते १७ मे २०२५ पर्यंत करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ सकाळी १०.०० वाजता साखरपा आरोग्य केंद्र आणि डेरवण हॉस्पिटल स्वामी समर्थ नेत्र रुग्णालय ता. चिपळूणच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी ७.०० वाजता कोकण ताशे स्पर्धा- २०२५ या कोकणातल्या वाद्य परंपरेशी आधारित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक १११११/- आकर्षक चषक व सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक ७७७७/-आकर्षक चषक व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक ५५५५/- आकर्षक चषक व सन्मानपत्र व सर्व सहभागी संघाना सन्मानपत्र समारंभपूर्वक देण्यात येईल. या स्पर्धेची प्रवेश फी रु १०००/- बंधनकारक राहील .
सदर प्रवेश फी नंबर ९८९२२७०३३८ या ऑनलाइन पे नंबरवर संपर्क साधून जमा करावी. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक १७ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा हा विशेष कार्यक्रम महिलांकरिता आयोजित करण्यात आला आहे. पहिले बक्षीस सोन्याची नथ व प्रमाणपत्र दुसरे बक्षीस सेमी पैठणी व प्रमाणपत्र व सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना भेटवस्तू दिली जाईल. अधिक माहिती करिता प्रदीप प्रकाश कांबळे ( खजिनदार) भ्रमणध्वनी ९८९२२७०३३८ किंवा अशोक बबन कांबळे ( सरचिटणीस) भ्रमणध्वनी ९९६९५१४८९१) या क्रमांकावर संपर्क साधावा.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुंबई कार्यकारिणीचे अध्यक्ष ,सुभाष कांबळे , ग्रामीण कार्यकारिणीचे अध्यक्ष, सिद्धार्थ कांबळे, महिला कार्यकारणीच्या अध्यक्षा, सौ. वैष्णवी कांबळे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला सर्व समाज घटकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे