सावर्डे विद्यालयाची आर्या नांदिवडेकर प्रथम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 सावर्डे विद्यालयाची आर्या नांदिवडेकर प्रथम

तळवली (मंगेश जाधव)

कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांच्यावतीने मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 97.43 एवढा लागला आहे. आर्या नांदिवडेकर प्रथम क्रमांक, आरोही क्षीरसागर द्वितीय, स्वरा सरमळकर तृतीय क्रमांक पटकावला.

 

या परीक्षेसाठी विद्यालयातून मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून 272 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 265 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत व विद्यालयाचा शेकडा निकाल 97.43 इतका लागला आहे. विद्यालयातून आर्या नांदिवडेकर 99%,आरोही क्षीरसागर 98.40%, स्वरा सरमळकर 97.80% गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटविण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पैकी विशेष प्रावीण्य 68 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 106 विद्यार्थी व द्वितीय श्रेणी 71 विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे.

 

यशस्वी सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले असून सावर्डे परिसरातून ग्रामस्थांच्या कडूनही या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...