साटवली बौद्धजन हितवर्धक सेवा मंडळ यांच्याकडून संयुक्त जयंती उत्सव आयोजन.
(लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण)
लांजा तालुक्यातील साटवली बौद्धवाडी येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे 20 ,21 मे 2025 रोजी करण्याचे ठरवले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा हे दिनांक 20/5/205 रोजी सकाळी 10.00 वाजता ध्वजारोहण आणि बुद्ध वंदना, स्थानिक मान्यवरांचा सन्मान, लहान मुलांचे मनोरंजन व दुसऱ्या दिवशी 21/ 5 /2025 रोजी सकाळी 10.00 वाजता बुद्ध वंदना, प्रमुख अतिथी यांचे मनोगत व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी साटवली पंचक्रोशी तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे साटवली बौद्धजन हितवर्धक सेवा मंडळ, माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने अध्यक्ष श्री. संजय सोनू जाधव, उपाध्यक्ष मनोहर राजाराम जाधव साटवली बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे.