शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुवर्ण पदक प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम)
डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली यांचा ४३ वा दिक्षांत समारंभ नुकताच मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सि.पी.राधाकृष्णन,राज्याचे कृषि मंत्री ना.माणिकराव कोकाटे,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे हे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते.
याच दिक्षांत समारंभामध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील कुमारी सेजल शिंदे (कृषि जैवतंत्रज्ञान शाखा) व कुमारी विधी राठी (अन्नतंत्रज्ञान शाखा) यांना माननीय राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.कुमारी सेजल व विधी यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले व या दोघींना ही पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यीनीना या दैदीप्यमान यशासाठी प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.