गुहागर मधील खराब रस्त्याचा मार्ग झाला मोकळा अधिकारी यांचे लोकशाही दिनात सहभाग
नागरिकांच्या पाठपुराव्याला यश
आबलोली (संदेश कदम)
गुहागर ते शासकीय विश्राम गृह तिसरे वाकण पर्यंत च्या खराब रस्त्या बाबत गेले दोन महिने गुहागर प्रेमी नागरिकांचे वतीने गुहागर चे स्थानिक प्रशासनाकडे व गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चिपळूण येथे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता या बाबत निवेदन देण्यात आले होते या प्रकरणी गुहागर तहसीलदार यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत आजच्या लोकशाही दिनात महामार्गचे सक्षम अधिकारी यांना बोलावून घेतले आजच्या लोकशाही दिनात याबाबत चर्चा झाली सक्षम अधिकारी शाम खुचेकर यांनी येत्या २४ मे २०२५ च्या आत या खराब रस्त्या बाबत कामं सुरु करण्यात येईल असे नागरिकांना ठोस आश्वासन दिले त्यामुळे या खराब रस्त्याचा मार्गदर्शन मोकळा झाल्याने गुहागर प्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आज पार पडलेल्या लोकशाही दिनाला पदाधिकारी अनिल शिंदे,विशवनाथ रहाटे, अरुण भुवड, विनोद जानवळकर, नामदेव अवेरे, पराग कांबळे, अभिजित रायकर आदी.उपस्थितीत होते. दरम्यान याबाबत प्रशासनाने चांगले सहकार्य केल्या बद्दल पराग कांबळे यांनी जाहीर आभार मानले