मनसेच्या आबलोली शहर अध्यक्षपदी सुमित पवार यांची नियुक्ती
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुमित रमेश पवार (आबलोली-बौध्दवाडी) याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षाचे वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आबलोली शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे शृंगारतळी येथील हेमंत हॉटेल येथील कॉन्फरन्स हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साठले, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, पडवे गटातील कार्यकर्ते राजेश गडदे आदी. महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.