आदरणीय महात्मा भरतजी डिंगणकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बुधवार दि. २१ मे २०२५ रोजी संत निरंकारी सत्संग भवन, विलेपार्ले येथे प्रेरणा दिवस कार्यक्रमाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील कोळवळी पंचक्रोशीचे नेते दिवंगत एस. डी. पवार साहेब यांचे मानसपुत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रात दिपस्तंभा सारखे काम करणारे आपल्या कर्तृत्ववाने सुपरीचीत झालेले गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा गावचे सुपुत्र व सामाजिक, शैक्षणिक, कला क्रिडा क्षेत्र याच बरोबर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस – रात्र झटणारे निष्ठावंत प्रस्त ब्रह्मलीन महात्मा आदरणीय भरतजी डिंगणकर यांचे गुरुवार दिनांक १५ मे २०२५ रोजी आकस्मित निधन होऊन ब्रह्मलीन झाले. यांच्या पाश्चात पत्नी सुगंधा, मुलगे समीर, स्वप्निल, बहीण व भाऊ शरद असा परिवार आहे
आदरणीय महात्मा भरतजी डिंगणकर यांचा प्रेरणा दिवस कार्यक्रम बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता ते रात्रौ ०९:०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संत निरंकारी सत्संग भवन, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऑफ हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई – ४०००५७ येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजन प्रसाद ठेवण्यात आला आहे.
आदरणीय महात्मा भरतजी डिंगणकर यांच्या महान कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महात्माचे हितचिंतक, आप्तेष्ट, मित्र मंडळी व नातेवाईक यांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन आदरणीय शरद डिंगणकर आणि संपूर्ण डिंगणकर परिवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे