अवकाळी पावसाचा तडाखा : धोपावे, वेलदूर भागातील नुकसानग्रस्त भागाची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रमोद गांधी यांचा नागरिकांना दिलासा; संरक्षक भिंतीची मागणी, स्थलांतराच्या सूचना
बातमी – संदेश कदम
गुहागर तालुक्यात आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे धोपावे व वेलदूर नवानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे वस्तूंचे, अन्नधान्याचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धोपावेचे सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, आदेश पवार व ग्रामपंचायत सदस्य, नुकसानग्रस्त नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते.
धोपावे गणेश नगर येथील मच्छीमार समाजाच्या वस्तीमध्ये पावसामुळे चार ते पाच फूट उंच पाणी घरात घुसले असून संपूर्ण वस्तू भिजल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून या नागरिकांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. या भागात खाडी लगत संरक्षक भिंत उभारणे ही काळाची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावर मनसेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन प्रमोद गांधी यांनी दिले.
वेलदूर नवानगरमध्ये घराशेजारी दरड कोसळल्याची घटना घडली असून, तिचीही पाहणी मनसेच्या प्रतिनिधींनी केली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेण्यात आली.
या पाहणीत मनसे तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, रानवी शाखाध्यक्ष सुर्वे, राहुल जाधव हे मनसे सैनिक उपस्थित होते.
—
????️ #अवकाळीपाऊस #गुहागर #मनसे #प्रमोदगांधी #धोपावे #वेलदूर #नुकसानग्रस्त #GaneshNagar #MNSReliefVisit #RatnagiriNews
—
???? फोटो