आंबेरे खुर्द तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. पांडुरंग गणपत पाते यांची अविरोध निवड.

*आंबेरे खुर्द तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. पांडुरंग गणपत पाते यांची अविरोध निवड..!*
आबलोली- (संदेश कदम) :
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्द या ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जेष्ठ समाज सेवक श्री. पांडुरंग गणपत पाते यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते जेष्ठ समाजसेवक श्री. पांडुरंग गणपत पाते यांची अविरोध निवड करण्यात आली. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या ग्रामसभेत ग्रामसेवक श्री. हरिश कुलये , सरपंच श्री. रविंद्र अवेरे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. विजय भूवड, मुख्याध्यापक श्री. महाकाळ, श्री. वसावे यांच्यासह सर्व समाजातील प्रमुख ग्रामस्थांच्या व विशेष करून महिलांच्या बहूसंख्य उपस्थितीत हि निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या श्री. पांडुरंग गणपत पाते यांचेवर आंबेरे खुर्द पंचक्रोशी मधून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. नवनिर्वाचित तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. पांडूरंग गणपत पाते यांनी गावाच्या विकासासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन गावाचा एकोपा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे सांगून सर्वांना धन्यवाद दिले

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें