लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 


लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याचं वितरण सुरू; महिलांमध्ये आनंदाचं वातावरण

नवी मुंबई (मंगेश जाधव) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या ₹1500 हप्त्याचं वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. योजनेचा अकरावा हप्ता खात्यावर जमा होऊ लागल्याने महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 सन्मान निधी दिला जातो. एप्रिल महिन्याची रक्कम 7 मे रोजी जमा करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आजपासून लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना एकूण ₹16500 इतकी रक्कम मिळालेली आहे. काही महिन्यांमध्ये दोन हप्त्यांची रक्कम एकत्र देण्यात आली होती, जसे की फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले होते.

आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली असून, “लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.


#माझी_लाडकी_बहीण #सन्माननिधी #महिला_कल्याण #लाभार्थी #आदितीतटकरे #नवीनUpdates #महाराष्ट्र_सरकार #रत्नागिरीवार्ताहर


???? फोटो 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...