हिंदूस्थानची संस्कृती जगात सर्वोत्तम. बलदेव दास
निघोज. / प्रतिनिधी ( नदकुमार बागडे पाटील)
राजूशेठ कवाद, कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय लंके, पत्रकार संपतराव वैरागर, सागर ईरोळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बलदेव दास यावेळी म्हणाले गेली कित्येक वर्षांपासून मी विदेशातील अनेक देशांचा दौरा केला.ईस्कॉन माध्यमातून संस्कृती कुणाची सर्वश्रेष्ठ आहे याचा अभ्यास केला. हिंदूस्थानात आल्यानंतर
हरे राम हरे कृष्ण मंदीराच्या दर्शनासाठी सर्वाधिक वेळ दिला मात्र गेली तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात मला या भारत देशाची संस्कृती सर्वाधिक आवडली असून ही संस्कृती जगात सर्वोत्तम असल्याचे माझे ठाम मत आहे. मात्र या भारत मातेची सध्याची युवा पिढी पाश्चात्य देशांच्या संस्कृतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असून ते अंत्यत चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गेली अनेक वर्षांपासून माझा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त व कांदा व्यवसायीक संतोषशेठ रसाळ,जी आर एल कंट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे,बालाजी कलरचे कवाद, राजूशेठ कवाद यांच्याशी स्नेहसंबंध जोडला गेला आहे. गेली कित्येक वर्षांपासून त्यांनी मला सातत्याने बोलावले आहे म्हणून मला या परिसरात येण्याची संधी मिळाली असून राज्यातील जागृत देवस्थान मळगंगा देवीच्या दर्शनाने मी पावण झालो आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसर हा नैसर्गिक आविष्कार किती वेळ पाहात राहावा तरी सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटेल असे वाटत नाही या भारत मातेच्या कुशीत असे असंख्य निसर्गाचा आविष्कार असलेले पर्यटन स्थळे आहेत मात्र कित्तेक देश फिरलो मात्र हा जगप्रसिद्ध रांजणखळगे हा निसर्गाचा आविष्कार काही औरच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त करीत केंद्र सरकारने यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून या परिसराच्या विकासासाठी मोठा हातभार लावल्यास जगातील पर्यटक मोठया संख्येने या ठिकाणी येतील स्थानिक लोकांना या निमित्ताने रोजगार व व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध होउन या परिसरातील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.बलदेव दास यांना फक्त इंग्रजी तसेच थोड्या प्रमाणात हिंदी भाषा अवगत असल्याने ते इंग्रजीत काय म्हणतात याचे भाषांतर कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे, जी आर एल कंट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर तसेच राजूशेठ कवाद यांनी केले यावेळी सुबोध महाराज यांनी उपस्थित ग्रामस्थांबरोबर हिंदू संस्कृती आणी जगातील देशांमध्ये असणारा देवधर्म यावर सविस्तर चर्चा करीत उपस्थीतांना मार्गदर्शन केले. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट संचालित मळगंगा प्रसादालयाला वाढदिवस निमित्ताने प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र लंके व पत्रकार संपतराव वैरागर यांनी देणगी दिली यावेळी बलदेव दास यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुण त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त अनिल शेटे यांनी केले शेवटी प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर यांनी आभार मानले.
चौकट
शहरांपेक्षा ग्रामीण भागात संस्कृती आणी माणुसकीचे दर्शन घडत असून देवधर्म आणी त्यांची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागातील खेडूत नेहमीच आघाडीवर आहे. म्हणून देवाचे दर्शन माणसांत घ्यायचे झाल्यास ग्रामीण भागात राहणे गरजेचे असल्याचे मत बलदेव दास यांनी व्यक्त केले आहे.