:
???????? मित्र पक्षांवर न राहता स्वबळावर लढा!
स्थानीय निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने मैदानात उतरा – जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने यांचे आवाहन
देवरूख (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) संगमेश्वर तालुक्याची कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज देवरूख येथील पक्ष कार्यालयात पार पडली. तालुकाध्यक्ष बाबा साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 10 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनाचे नियोजन तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनिती ठरवण्यात आली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुरेशशेठ बने यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की, “मित्र पक्षांवर अवलंबून राहू नका. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. पक्षाच्या कठीण काळात साथ दिलेल्यांना प्राधान्य देऊनच उमेदवारी दिली जाईल.” तसेच प्रत्येक गणानुसार दौरे करून इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणावर विशेष चर्चा झाली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ताराम लिंगायत, जिल्हा खजिनदार बाबा सावंत, शहराध्यक्ष निलेश भुवड, नंदू जाधव, अल्पसंख्यांक विभागाचे अल्ताफ जेठी, सानिका पाटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचा समारोप करताना तालुकाध्यक्ष बाबा साळवी यांनी सर्वांचे आभार मानले.
????#राष्ट्रवादी_शरदपवार #देवरूख #संगमेश्वर #स्थानीयनिवडणूक #सुरेशबने #BabaSalvi #NCP #RatnagiriPolitics #राजकारण
???? फोटो