???????? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता 20 जून रोजी वितरित होणार; ई-केवायसी व आधार लिंकिंग गरजेचे
रत्नागिरी (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीतील २० वा हप्ता २० जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १,७२,४५७ शेतकरी नोंदणीकृत असून, यापैकी ३८८० जण ई-केवायसी आणि ७१६९ जणांचे बँक खाते आधारशी संलग्न नसल्याने त्यांचे हप्ते अद्याप थांबले आहेत.
जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करून आपली पात्रता निश्चित करावी.” या कामासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि CSC (सामायिक सुविधा केंद्रे) कार्यरत आहेत.
✅ AgriStack अंतर्गत फार्मर आयडीही आवश्यक!
PM किसान योजनेत नाव कायम ठेवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे. आजवर १,२५,७४० शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केले आहेत, तर ४६,७१७ प्रलंबित आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी तात्काळ करावी.
या प्रक्रियेसाठी कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभागातील अधिकारी व CSC केंद्रांशी संपर्क साधावा. २० जूनपूर्वी सर्व बाबी पूर्ण न केल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
???? महत्वाचे टप्पे:
- ???? २० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा
- ???? बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
- ???? फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक
????#PMKisan #किसान_निधी #RatnagiriKisan #Agristack #FarmerID #EKYC #आधारसीडिंग #शेतकरी_हित #RatnagiriAgriculture #महाराष्ट्रशेतकरी
???? फोटो