???? गुहागर, तेली समाज सेवा संघाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
???? गुहागर तालुक्यातील युवा नेतृत्व व कार्याचा आढावा; नवे पदाधिकारी सत्काराने गौरवले
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पाटपन्हाळे (श्रृंगारतळी) येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात पार पडली. संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेची सुरुवात दीपप्रज्वलन व पूजनाने करण्यात आली.
सहसचिव गणेश किर्वे यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. सचिव प्रवीण रहाटे यांनी वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. ‘तेली वधु वर डॉट कॉम’ या उपक्रमास समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गटप्रमुख, उपगटप्रमुख व गावप्रमुखांची माहितीही यावेळी सादर करण्यात आली.
सभेत मागील इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच 2024-25 चा हिशेब सादर करत पुढील आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकाची नेमणूकही झाली. “गावभेट” उपक्रमाद्वारे समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यावर भर दिला जात असल्याचे कार्यकारिणीने सांगितले.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. समीर महाडिक (युवक जिल्हाध्यक्ष), दिव्या दीपक किर्वे (महिला तालुका अध्यक्ष), प्रशांत रहाटे (युवक तालुका अध्यक्ष), गजानन उर्फ दिलीप जाधव (गुहागर तालुका काँग्रेस अध्यक्ष) यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रकाश झगडे, उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव प्रवीण रहाटे, सहसचिव गणेश किर्वे, खजिनदार विश्वनाथ रहाटे, महिला समिती अध्यक्ष दिव्या किर्वे, युवक समिती अध्यक्ष प्रशांत रहाटे, युवक जिल्हाध्यक्ष समीर महाडिक यांच्यासह प्रा. संदीप महाडिक, संदीप राऊत, रोहिणी रहाटे, प्राची पवार, अस्मिता झगडे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन प्रवीण रहाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव गणेश किर्वे यांनी केले.
—
????️ #तेलीसमाज #गुहागर #वार्षिकसभा #समाजकार्य #YouthLeadership #SocialUnity #RatnagiriNews #GuhagarUpdates
???? फोटो