ठाकरे बंधू एकत्र येणार? महायुतीची धाकधूक वाढली; टक्कर देण्यासाठी रणनीती आखली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ठाकरे बंधू एकत्र येणार? महायुतीची धाकधूक वाढली; टक्कर देण्यासाठी रणनीती आखली

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा; महायुती मुंबईत एकत्र लढण्याच्या तयारीत!

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या दोघांमध्ये समेटाची चर्चा सुरू असून, सकारात्मक विधानांची देवाणघेवाण झाल्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या संभाव्य युतीचा सामना करण्यासाठी सत्ताधारी महायुती गोटात हालचालींना वेग आला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईतील मराठी मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण होऊ शकते, आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून सध्या अशी रणनीती आखली जात आहे की, मुंबईत तिन्ही पक्ष — भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट — एकत्र येऊन लढतील, तर अन्य महापालिकांमध्ये स्थानिक ताकदेनुसार स्वबळ आजमावले जाईल. उदाहरणार्थ, ठाण्यात शिंदे गट, पुणे-नागपूर-नवी मुंबईत भाजपचा जोर असल्यामुळे तिथे स्वबळावर लढण्याची तयारी आहे.

सर्व्हेचा निष्कर्ष काय सांगतो?

‘विकली वाईब’ या सर्व्हे संस्थेनुसार, ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबईत तब्बल ५२.१% मतदारांचा कौल त्यांना मिळू शकतो. तर, शिंदे गटाला २६.२% मतदारांचे समर्थन राहील, असं या सर्व्हेत स्पष्ट झालं आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीला ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडून मोठी टक्कर मिळू शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

???? हॅशटॅग्स:

#ठाकरेबंधू #मुंबईमहापालिका #महायुती #शिवसेना #मनसे #भाजप #राजकारण #मराठीमतदार #BMC2025 #RatnagiriVartahar

 

 

???? फोटो

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...