केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात ५ भाविकांचा मृत्यू; खराब हवामानामुळे भीषण दुर्घटना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात ५ भाविकांचा मृत्यू; खराब हवामानामुळे भीषण दुर्घटना

गौरीकुंड-त्रिजुगीनारायण दरम्यान जंगलात कोसळले आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर; ७ पैकी ५ प्रवाशांचे मृत्यू निश्चित

देहराडून केदारनाथ यात्रेदरम्यान आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण होते.

सकाळी ५:१७ वाजता आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून उड्डाण करून गुप्तकाशीच्या दिशेने निघाले होते. मात्र वाटेत अतिवृष्टी, दाट धुके आणि दृश्यता कमी असल्यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावले आणि गौरीकुंड व त्रिजुगीनारायण दरम्यानच्या जंगलात कोसळले.

या घटनेनंतर रेस्क्यू पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघाताची प्राथमिक कारणे हवामानातील अचानक बदल, खराब दृश्यता आणि टेकऑफनंतरचा तांत्रिक अडथळा असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तराखंडचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी माहिती देताना सांगितले की, “अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते. त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिक तपशील लवकरच देण्यात येईल.”

दरवर्षी हजारो भाविक केदारनाथ धामात हेलिकॉप्टरने दर्शनासाठी जात असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची दुर्घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.


???? हॅशटॅग:

#KedarnathHelicopterCrash #AryanAviation #BreakingNews #केदारनाथ #हेलिकॉप्टरअपघात #UttarakhandNews #केदारनाथयात्रा #Guptkashi #KedarnathYatra2025


???? फोटो 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...