शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व कृषि विभाग, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व प्रदर्शन उत्साहात संपन्न..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय व कृषि विभाग, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व प्रदर्शन उत्साहात संपन्न..!

आम. शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती..!*

आबलोली (संदेश कदम) …..

चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने गोविंदरावजी निकम काॅलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे भव्य रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास सावर्डे पंचक्रोशीतील महीला , शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यी व महीला कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.उपस्थित महीला वर्गाला रानभाजयांचे महत्व व त्यांचे ओषधी गुणधर्म याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॅ.ओंकार निर्मळ यांनी उपस्थित महीलांना याविषयी मार्गदर्शन केले.पाककला स्पर्धेमध्ये सुप्रिया पुनवत यांनी प्रथम, श्रेया पवार हीने द्वितीय तर जान्हवी चव्हाण हीने तृतीय क्रमांक पटकावला व पोस्टर्स प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये अंजली जाधव हिने प्रथम, सृष्टी देसाई हिने द्वितीय व प्रिती शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजयी स्पर्धकांचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, तालुका कृषि अधिकारी श्री.म्हेत्रे ,प्रा.हरिश्चंद्र भागडे व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व स्पर्धक व महीला वर्गाचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केले व रानभाज्यांचे महत्व तरुण पिढी पर्यत पोहोचविण्याचे आवाहन केले.या स्पर्धेसाठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वाकचौरे व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रिया सकपाळ यांनी परिक्षक म्हणुन काम पाहीले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका स्मिता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड

आमदार किरण सामंत यांची विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड राजापूर प्रतिनिधी:-पुरुषोत्तम खांबल राजापूर- लांजा -साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची...
Read More

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन