????️ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे अपघाती निधन
चिरणी पुलाजवळील अपघातात गंभीर जखमी; उपचारादरम्यान कोल्हापुरात निधन
नवी मुंबई (मंगेश जाधव) | 18 जून 2025
खेड तालुक्यातील चिरणी येथे मंगळवारी (17 जून) दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे (वय 65) गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मोहन आंब्रे हे शिवसेनेच्या जुन्या पिढीतील निष्ठावान, कडवे आणि कार्यक्षम नेते म्हणून परिचित होते. त्यांनी तालुका प्रमुख, पंचायत समितीचे उपसभापती अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. चिरणी गावासह संपूर्ण खेड तालुक्यावर त्यांचा ठसा होता.
त्यांच्या अपघाती निधनामुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आर्मीमधून निवृत्त भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.