जि.प.आदर्श केंद्रशाळा खेर्डी नं.१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अबलोली संदेश कदम
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशाळा खेर्डी नं.१ या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगदिनाचे सुरुवातीला श्रीम. भागवात मॅडम यांनी २१ जून या दिनाचे महत्व सांगून याच दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे कारण स्पष्ट केले.तर पदवीधर शिक्षक श्री. दिपक रेपाळ यांनी अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचे महत्व सांगून शारीरिक, मानसिक आणि बौध्दीक आरोग्य उत्तम असणे म्हणजे खर्या अर्थाने निरोगी असणे तसेच निरामय आयुरारोग्याकरिता योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन कालखंडापासून भारताने जगाला योग विषयक सखोल ज्ञान दिलेले आहे अशी माहिती दिपक रेपाळ यांनी दिली.
त्यानंतर श्रीम. त्रिशला तलवारे यांनी सूक्ष्म हालचालींपासून बाॅडी वॉर्मअप ला सुरुवात करुन उभे आसन प्रकार, बैठे आसन प्रकार यांचे प्रात्यक्षिक करुन घेतले. त्यानंतर योगा ट्रेनर श्रीम. स्मिता महाडिक यांनी पुन्हा दुसर्या बॅच करिता वरील प्रमाणे माहिती सांगून प्रात्यक्षिक करुन घेतले योगदिन साजरा करण्या करिता चिपळूण नं. २ प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रमाकांत नाना पवार साहेब आवर्जून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मौलिकमार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. माधवी जंगम,उपशिक्षिका श्रीमती. शर्वरी खताते,श्रीमती.सायली वरेकर, श्रीमती.माधुरी चव्हाण,श्रीमती.कल्याणी भागवत,श्रीमती.नेहा सुर्वे,श्रीमती.उज्वला गुरव, श्री. दिपक रेपाळ श्रीमती.त्रिशला तलवारे, दिपक वाघडोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे यशस्वी झाला शेवटी पदवीधर शिक्षक श्री. दिपक रेपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली