वसई नगरीत कवितोत्सव २०२५ “सहयोग”तर्फे रंगला कवितेचा साज
वसई – संदीप शेमणकर
शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी.साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या “कवितोत्सव २०२५” या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन “सहयोग लोककला मंच” तर्फे करण्यात आले. वसईतील रसिकांच्या उपस्थितीत शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात वसई, विरार, पालघर, बोईसर येथून आलेल्या एकूण ३० कवींचा मनोहारी सहभाग होता.
प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री कविता मोरवणकर (कांदिवली) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध गझलकार प्रा. उत्तम भगत सरांनी भूषवले.
सादरीकरण करणाऱ्या कवींच्या यादीत
किशोर पवार, हरिश्चंद्र मिठबावकर, विक्रांत केसरकर, मधुकर तराळे, प्रांजली काळबेंडे (काव्यप्रांजू), गया गवळी, वीणा चाफेकर, विभुती चाफेकर, नयना हबळे, शितल संखे, मनिषा पाटील, रुपाली राऊत, मोहन वायकोळ, सचिन घरत यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत तरल आणि नेटके शिल्पा परूळेकर पै यांनी केले.
तसेच मान्यवर जेष्ठ साहित्यिक सायमन मार्टिन यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून उपस्थितांना साहित्याची गहिरी जाण आणि प्रेरणा दिली.
या कार्यक्रमात विविध प्रकारच्या कविता – मुक्तछंद, गझल, गीत, आणि भावकविता सादर झाल्या. रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि कलात्मक रितीने झाले होते.
“सहयोग लोककला मंच” च्या या उपक्रमामुळे स्थानिक कवींच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाले असून, परिसरातील साहित्यिक वातावरण समृद्ध झाले आहे.
कार्यक्रमाची सांगता एक सुंदर सामूहिक कविसंवादाने झाली, ज्याने उपस्थितांच्या मनात अजूनही कविता साजून राहिली आहे.