ज्येष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पार पडला.
खेड तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या स्व.मॉंसाहेब मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती..
📍खेड, रत्नागिरी |.
रामदास भाईंच्या वाढदिवसानिमित्त आज खेडवासीयांना सुंदर अशा नाट्यगृहाची भेट मिळत आहे ही आनंद आणि समाधानाची बाब आहे, असे नमूद करून रामदासभाईंना मनापासून शुभेच्छा दिल्या. २००७ सालापासून हे नाट्यगृह बंद होते, मात्र आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे आज खेडवासियांचे हे स्वप्न साकार होत आहे. योगेश हा एक काम करणारा मंत्री असून आजवर त्याने जे मागितले ते फक्त खेडमधील नागरिकांसाठीच मागितले आहे. यानिमित्ताने चांगल्या कलाकृती पाहण्याची संधी येथील नाट्य रसिकांना मिळणार आहे. स्वर्गीय मॉंसाहेब मिनाताई ठाकरेंच्या नावाने तयार करण्यात आलेले हे नाट्यगृह म्हणजे शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचे प्रतिक ठरेल असे गौरवद्गार याप्रसंगी काढले.
योगेशने खेड तालुक्यात अनेक विकासात्मक बदल केले, काहींना हे सहन होत नसल्याने त्याच्यावर टीका करक आहेत. पण आपला फोकस हा विकास असून त्यापासून ढळू नकोस, तुझ्यावर कुणी आरोप केले त्याच्या मुळाशी आपण जाऊ पण तुझ्या मागे हा एकनाथ शिंदे ठामपणे उभा आहे असे यावेळी आवर्जून नमूद केले.
*कोकणातील नद्यांमधून वाहून जाणाऱ्या ६७ टीएमसी पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असून त्याचा सर्व्हे सुरू झाला आहे. कोकणातील तरुणांच्या रोजगारासाठी त्यांनी मागणी केलेली सिंधुरत्न योजना लवकरच सुरू करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन अशी ग्वाही याप्रसंगी दिली. कोकणाचा विकास करण्यासाठी आपण मुंबई – सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता तयार करतोय, कोस्टल हायवे तयार करण्यासाठी आपण नऊ खाडी पूल उभारत आहोत, त्यासोबतच कोकणातील राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वाकडे जात असून पुढील वर्षी खराब रस्त्याची तक्रार राहणार नाही असेही यावेळी अधोरेखित केले. तसेच खेड प्रमाणे दापोली येथे देखील नाट्यगृह उभारण्यासाठी नगरविकास खात्याच्या निधीतून १५ कोटी रुपये देऊ असेही याप्रसंगी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला कायम ठेवायचे असून त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन देखील यावेळी केले.*
*याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम, उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, शिवसेना उपनेते व मा. आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राजेंद्र महाडिक,सौ.श्रेया योगेश कदम, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच खेड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#khed #ramdaskadam #योगेशकदम eknath _shinde