शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यावर भर!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यावर भर!

पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट; खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा संसदेत आणि मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा
पुणे, २५ जून २०२५: पुणे व सोलापूर विभागाच्या रेल्वे समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, २३ जून २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, ज्यात पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अग्रस्थानी ठेवले.
खासदार डॉ. विखे पाटील यांनी जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेसारख्या देशांमधील भव्य टेलिस्कोपच्या परिसरातून यशस्वीरित्या रेल्वे प्रकल्प राबविल्याचे उदाहरण दिले. भारतात असलेल्या GMRT (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) प्रकल्पाच्या स्थानामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. योग्य नियोजन आणि अंमलबजावणीच्या आधारावर पूर्वी ठरलेल्या मार्गानेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या बैठकीत मांडलेले इतर महत्त्वाचे मुद्दे असे होते:
* श्रीरामपूर रेल्वे विभागातील अतिक्रमणासंदर्भात.
* बेलापूर तालुका श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर नवीन मालधक्का उभारण्याबाबत.
* लाडगाव पडेगाव, तालुका श्रीरामपूर येथे रेल्वे लाईन हद्दीत अंडरपास बांधण्याबाबत.
* मध्य रेल्वेच्या दौंड-मनमाड मार्गावरील गाड्या बेलापूर स्थानकावर थांबवण्यात याव्यात.
* आंचलगाव, खिर्डी गणेश, बोलकी येथील शेतकऱ्यांना रेल्वे विभागाच्या हद्दीतून शेतीसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
* कोरोना कालावधीत बंद करण्यात आलेल्या सुविधा व गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात.
* मनमाड-पुणे रेल्वे सेवा सुरू करणे.
* साईनगर-अमळनेर रेल्वे सुरू करणे.
* साईनगर-पंढरपूर रेल्वे सुरू करणे.
* साईनगर ते शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्ग सुरू करणे.
* बेलापूर ते परळी रेल्वे मार्ग सुरू करणे.
* शिर्डी ते शहापूर रेल्वे सुरू करणे.
* नागरसोल ते शिर्डी रेल्वे सुरू करणे.
* साईनगर-पुणे-दादर एक्स्प्रेस दररोज सुरू करण्याबाबत.
या बैठकीला खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीमती रजनीताई पाटील, राज्यसभा खासदार श्री. नितीन पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार श्री. निलेश लंके, खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील, खासदार श्री. श्रीरंग बारणे, खासदार श्री. ओमराजे निंबाळकर, खासदार श्री. अमोल कोल्हे, खासदार श्री. शिवाजीराव काळगे यांच्यासह मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धरमवीर मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले की, हे प्रकल्प त्यांच्या मतदारसंघासाठी “ड्रीम प्रोजेक्ट” असून, यामुळे शिर्डी मतदारसंघात प्रवास, व्यवसाय, रोजगार आणि शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील. तसेच, यामुळे सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांसाठी आपण संसद व मंत्रालय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने अनेक मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही सर्व कामे तातडीने मार्गी लागतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “जनतेच्या प्रश्नांवर मी नेहमीच ठाम राहिलो आहे आणि पुढेही राहणार आहे,” असेही ते म्हणाले.

बातमी – नंदकुमार बागडेपाटील अहिल्यानगर 

 

#पुणेनाशिकरेल्वे #शिर्डीविकास #रेल्वेप्रकल्प #खासदारसुजयविखेपाटील #ड्रीमप्रोजेक्ट

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी