पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा मानसिक छळ… सासूच्या दमदाटीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🟥 पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा मानसिक छळ… सासूच्या दमदाटीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या!

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणे फाट्यावर धक्कादायक घटना… पती आणि सासूवर पोलिसात गुन्हा दाखल

चिपळूण | प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील खांदाट-मोरवणे फाटा येथे एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध, सतत होणारी मारहाण आणि सासूच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून शकुंतला अशोक चव्हाण (वय २७) या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

ही घटना बुधवार, २६ जून रोजी सकाळी ११.३० ते १२ दरम्यान घडली. याप्रकरणी पती अशोक मोतीराम चव्हाण आणि सासू कमलाबाई मोतीराम चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १०८, ८५, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वडिलांची फिर्याद… पतीचे बाहेर चाललेले प्रेमसंबंध

शकुंतलाच्या वडिलांनी विनायक जयसिंग राठोड (५५, रा. जानवळ, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती अशोक याचे कामातल्या एका महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. या कारणावरून घरात वारंवार भांडणे आणि शकुंतलावर शारीरिक मारहाण केली जात होती.

सासूच्या शिवीगाळी आणि दमदाटीने त्रस्त…

याशिवाय सासू कमलाबाई चव्हाण ह्या देखील तिला शिवीगाळ, दमदाटी करत असत. ‘तू घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही’ असे बोलून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल… पुढील तपास सुरू

या सततच्या छळाला कंटाळून शकुंतलाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असल्याचा तिच्या वडिलांचा आरोप आहे. चिपळूण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

 

🟩 #हॅशटॅग्स :

 

#चिपळूण #मोरवणेफाटा #गृहहिंसाचार #स्त्रीछळ #विवाहबाह्यसंबंध #महिलांवरीलअत्याचार #आत्महत्या #PoliceCase #DomesticViolence #CrimeNews #RatnagiriNews #KonkanNews #MaharashtraCrime #WifeSuicide #ChiplunNews #MarathiNews #VivaahbaahyaSambandh #MentalTorture #IPC2023 #WomensSafety #MaharashtraNews

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...