मराठीच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनसेला कडक इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठीच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मनसेला कडक इशारा

मीरा-भाईंदर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची तीव्र प्रतिक्रिया; भाषिक वादावर कायदेशीर कारवाईचा दिला इशारा.

मुंबई: राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच मुंबईतील मीरा-भाईंदर येथे मराठी बोलण्यावरून झालेल्या वादामुळे मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.

मीरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला होता. या वादातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला, तर मनसेने आपली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीचा वाद उफाळून आल्याने भाजप आणि मनसे आमनेसामने आले आहेत. दरम्यान, मनसेने याप्रकरणी मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.

या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, भाषेवरून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. “आम्ही मराठी आहोत आणि आम्हालाही मराठीचा अभिमान आहे, परंतु एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात आणि त्यापैकी अनेकांना तेथील स्थानिक भाषा येत नाही. मग त्यांच्याशीही अशाच प्रकारे वागणूक मिळाली, तर काय होईल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी जोर देऊन सांगितले की, “भारतात अशा प्रकारची गुंडगिरी योग्य नाही. जर कोणी अशी गुंडगिरी केली, तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. भाषेवरून कोणी मारहाण करत असेल, तर हे सहन केले जाणार नाही.” मीरा रोड घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढेही अशाप्रकारे भाषेवरून कोणी वाद निर्माण केला, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. भारतातील कोणत्याही भाषेवर अशाप्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले. त्यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात, मग हा कोणता विचार आहे?”

#मराठी #देवेंद्रफडणवीस #मनसे #भाषावाद #मीराभाईंदर #राजकीय #महाराष्ट्र #गुंडगिरी #पोलिसकारवाई #भाजप

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा