प्रधानमंत्री पीक विमा: खरीप २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत नोंदणीची अंतिम संधी!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 प्रधानमंत्री पीक विमा: खरीप २०२५ साठी ३१ जुलैपर्यंत नोंदणीची अंतिम संधी!

गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे महत्त्वाचे आवाहन

आबलोली (संदेश कदम) – गुहागर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना: प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY), खरीप हंगाम २०२५ साठी नोंदणी सुरू झाली असून, याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई (ईमेल: pikvima@aicofindia.com) या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुहागर तालुक्यातील शेतकरी आता भात आणि नागली या अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण मिळवू शकतात. त्यामुळे, सर्व शेतकरी बांधवांनी ३१ जुलै २०२५ पूर्वी या योजनेचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर आणि उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पिकांसाठी विमा संरक्षण आणि हप्ता तपशील:

* भात पीक: प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ६१,०००/- रुपये असून, यासाठी शेतकरी विमा हप्ता रक्कम ४५७.५० रुपये आहे.

* नाचणी पीक: प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३५,०००/- रुपये असून, यासाठी शेतकरी विमा हप्ता रक्कम ८७.५० रुपये आहे.

पीक विमा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

* फार्मर आयडी (एग्रीस्टॅक क्रमांक)

* पीक नोंद असलेला ७/१२ उतारा

* आधारकार्ड प्रत

* बँक पासबुक प्रत

* पेरणी स्वयंघोषणापत्र

पीक विमा अर्ज नोंदणी कशी कराल?

शेतकरी खालीलपैकी कोणत्याही पर्यायाद्वारे आपला पीक विमा अर्ज नोंदणी करू शकतात:

* आपले सरकार सुविधा महा ई-सेवा केंद्र (CSC)

* नजीकच्या राष्ट्रीय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा खाजगी बँकेच्या शाखांमध्ये

* http://pmfby.gov.in या अधिकृत लिंकवर स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकता.

कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी ३१ जुलै २०२५ पूर्वीच आपला पीक विमा भरून घ्यावा. पीक विमा संदर्भात काही अडचणी उद्भवल्यास, शेतकरी बांधवांनी संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्याशी संपर्क साधावा, असे गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर आणि उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे.

 

 

#PMFBY #PikVima #CropInsurance #Kharip2025 #शेती #गुहागर #कृषीविभाग #LastDate #शेतकरी #रत्नागिरी #PrimeMinisterCropInsuranceScheme #PikVimaYojana #MonsoonFarming #A

gricultureMaharashtra

Reporters
Author: Reporters

Guhagar Office * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...