बसपाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
नंदकुमार बागडेपाटील, अहिल्यानगर यांचेकडून
श्रीरामपूर :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी उपस्थित प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अहिल्यानगर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले अण्णाभाऊ साठे यांची आज 1 ऑगस्ट रोजी 105 वी जयंती आहे. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.अण्णाभाऊ साठे यांना ‘लोकशाहीर’ या नावाने ओळखलं जात असे. एक महान समाजसुधारक, लोककवी, लेखक आणि लोककलाकार म्हणून तुकाराम भाऊराव साठे ओळखले जात असतं. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवसच शाळेत गेले. औपचारीक शिक्षण न मिळाल्याने त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि लोकपरंपरेतून ज्ञान संपादन केले.
यावेळी श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष जाकीर भाई शहा, भोंगळे सर, बापू भगत, सतीश परदेशी, संजय सूर्यवंशी, कृष्णा कदम, विजय सोलंकी, देविदास जावळे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.