वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.
खंडाळा प्रतिनिधी :- निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री.समीर बोरकर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती,महान विभूती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य टिळक,अण्णा भाऊ साठे,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संस्थेचे सचिव श्री.समीर बोरकर,मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप,जेष्ठ शिक्षक श्री. प्रल्हाद सरगर, क्रीडा विभाग प्रमुख डाॅ. राजेश जाधव,कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सहा.शिक्षक श्री.ईश्वर मगर सहा.शिक्षिका सौ.कविता ठाकरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रशालेतील विद्यार्थी कुमारी आराध्या कोळंबेकर,कुमारी मानवी खेडेकर आणि कुमार शौर्य चव्हाण यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन व कार्याविषयी अतिशय सुंदर माहिती आपल्या मनोगतातून कथन केली. तसेच या कार्यक्रमप्रसंगी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित शाहिर प्रसाद विभुते यांनी गायलेला पोवाडा सादर केला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.ईश्वर मगर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की, ” लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे विचार व कार्य फक्त वाचन व लेखन एवढ्या पुरतेच मर्यादित न ठेवता ते आचरणात आणले पाहिजेत. लोकमान्य टिळकांकडून देशभक्ती, देशप्रेम, निर्भीडपणा,स्पष्टवक्तेपणा तर अण्णा भाऊ साठे यांच्याकडून साहित्य लेखनाचा गुणधर्म घेतला पाहिजे आणि अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचले पाहिजे.”
तसेच अण्णा भाऊ साठे हे एक फक्त लोकशाहीर नव्हते तर एक वास्तववादी लेखक, संघर्ष योद्धा, साहित्यरत्न, शिवशाहीर, काॅम्रेड , संयुक्त महाराष्ट्राचे स्टार प्रचारक होते.हे उपस्थितांना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून पटवून दिले.
सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.प्रभाकर धोपट सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.सुनील कांबळे सर यांनी मानले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.