पुरी शाळेत थोर समाजसुधारकांना अभिवादनाचा कार्यक्रम!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🏫 पुरी शाळेत थोर समाजसुधारकांना अभिवादनाचा कार्यक्रम!

 

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विविध उपक्रम

 

📍 पुरी, गंगापूर तालुका | प्रतिनिधी – जिवन मावस, सहयोगी – नंदकुमार बगाडे पाटील

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुरी येथे आज थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. मोरे सर होते. ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर तांबे सर यांनी प्रस्तावना सादर केली.

 

कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकवृंद सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि दोन्ही थोर समाजसुधारकांच्या जीवनकार्याविषयी प्रभावी भाषणे दिली.

 

इंगळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना समर्पक मार्गदर्शन करताना त्यांच्या विचारांवर चालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात मा. मोरे सर यांनी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे आदर्श अंगीकारून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाची सांगता दारकुंडे सर यांनी केली. संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले होते.

 

 

 

🔖 #लोकमान्यटिळक #अण्णाभाऊसाठे #पुरीशाळा #गंगापुर #समाजसुधारक #शालेयकार्यक्रम #वक्तृत्वस्पर्धा #महापुरुषांचीस्मृती

 

📸 फोटो

 

 

 

 

 

.

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

Leave a Comment

आणखी वाचा...