साटवली विठ्ठल-रखुमाई-सत्यभामा मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू; शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
🔱 भक्तिरसात न्हालं साटवली गाव!
📍 लांजा प्रतिनिधी | जितेंद्र चव्हाण | रत्नागिरी वार्ताहर
लांजा तालुक्यातील साटवली गावातील ऐतिहासिक व पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई-सत्यभामा मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त पारंपरिक हरिनाम सप्ताह भक्तिभावात साजरा होत आहे. आज दुपारी २ वाजता सप्ताहाला मंगल प्रारंभ झाला असून, टाळ, मृदुंग, विना आणि पेटीच्या सुरेल गजरात संपूर्ण साटवली गाव भक्तिरसात न्हालं आहे.
शके १५६१ मध्ये, कार्तिक शुद्ध पंचमीस प्रारंभ झालेल्या या मंदिराच्या बांधकामास २१ ऑक्टोबर १६६९ रोजी सुरुवात झाली होती. शके १५६२ वैशाख शुद्ध ११ रोजी म्हणजेच २२ एप्रिल १६४० रोजी हे मंदिर पूर्ण झाले. व्यापारी गजसेठी श्रीपती गुजर यांनी जांबा दगडात सडेतोड बांधणी व कोरीव नक्षीकामासह हे मंदिर उभारले.
गाभाऱ्यातील लाकडी नक्षीकाम, बाहेरची श्रीगणेश, देव जनार्दन, हनुमंत, गरुड देव, महादेवाची पिंडी व नंदी यांच्या पाषाण मूर्ती आजही या मंदिराचा पुरातन ठसा दर्शवतात.
दरवर्षीप्रमाणे या मंदिरात सात दिवस चालणाऱ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन यंदा अडीच प्रहराच्या भक्तिसंकीर्तनात केले गेले आहे. साटवली गावातील तीन प्रमुख मेळे मिळून चार तासांचा हा भक्तिरस सोहळा साजरा करतात. परिसरातील पंचक्रोशीसह मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणाहून आलेले भाविक विठ्ठल-रखुमाई-सत्यभामा यांचे दर्शन घेत भक्तिमय अनुभव घेत आहेत.
📸 फोटो
#हॅशटॅग्स:
#साटवली #हरिनामसप्ताह #विठ्ठलरखुमाई #सत्यभामा #लांजा #RatnagiriVartahar #भक्तिरस #पुरातनमंदिर #ShravanSpecial #HarinaamWeek