🚨 साटवली ग्रामपंचायतीचा अनागोदी कारभार!
बाजारपेठेतील स्वच्छतागृह वर्षानुवर्षे दुर्गंधीयुक्त, पाण्याचीही सोय नाही; ग्रामस्थांचा संताप उफाळला
लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण
लांजा तालुक्यातील पंचक्रोशीतील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या साटवली बाजारपेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृह गेली अनेक वर्षे अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असून, पाण्याची सोयही नाही. याकडे साटवली ग्रामपंचायतीकडून उघड दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
साटवली हे आठवडा बाजार, शासकीय-निमशासकीय कार्यालये, बँका, पोलीस दूर शेत्र, हॉस्पिटल्स, शाळा व कॉलेज यामुळे सतत गजबजलेले ठिकाण आहे. येथे केवळ एकच सार्वजनिक स्वच्छतागृह असून, त्याची देखभाल होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. अनेक वेळा ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करूनही ग्रामपंचायत निष्क्रियच राहिली आहे.
गावातील व पंचक्रोशीतील लोकांचा ग्रामपंचायतीकडे एकमुखी आग्रह आहे की, तात्काळ स्वच्छता मोहिम राबवून पाण्याची सोय उपलब्ध करून हे स्वच्छतागृह नागरिकांच्या उपयोगासाठी योग्य स्थितीत आणावे. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत.
—
#साटवली #ग्रामपंचायत #लांजा #स्वच्छतागृह #पाण्याचीसोय #ग्रामस्थांचा_संताप #RatnagiriNews #LanjaNews #PublicToilet #SanitationIssue
📸 फोटो
—