नागालँड आणि मणिपूरच्या विद्यार्थिनींनी चिपळूण पोलिसांना बांधल्या राख्या
चिपळूणमध्ये संस्कृतीचा अनोखा संगम; नागालँड आणि मणिपूरच्या विद्यार्थिनींनी पोलिसांसोबत साजरा केला रक्षाबंधन
चिपळूण: महाराष्ट्रातील चिपळूणमध्ये नागालँड आणि मणिपूरमधील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. चिपळूणमधील एका वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थिनींनी येथील पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देताना मराठीतील ‘श्री गणेश आगमन’ गीतही सादर केले.
या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस अधीक्षक बगाटे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाणीत आणि सलोखा टिकवण्यात अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
#Chipulan #Nagaland #Manipur #Rakshabandhan #Police #CulturalExchange #चिपळूण #नागालँड #मणिपूर #रक्षाबंधन #पोलीस #सांस्कृतिकसलोखा #राखीपौर्णिमा