🚔 लांजा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्साहात; पोलीस बांधवांना बहिणींची राखी
महिला विभाग अध्यक्ष साक्षी पराडकर यांचा भावबंधाचा सन्मान; “महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर” – लांजा पोलीस
लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त लांजा तालुका माहिती अधिकार फेडरेशन महिला विभाग अध्यक्षा साक्षी पराडकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधली.
या वेळी पोलीस बांधवांनी “बहिणी व महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत” अशी ग्वाही दिली. त्यांनी आलेल्या महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाला लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावनिक आणि बंधुत्वाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
#लांजा #रक्षाबंधन #पोलीसठाणे #साक्षीपराडकर #माहितीअधिकारफेडरेशन #भावबंध #रत्नागिरी #Rakshabandhan2025 #PoliceRakshaBandhan #LanjaPolice
📷 फोटो
—