🥋 जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत डि.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल लांजा चमकली!
६ विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके पटकावून नाव रोशन केले
लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण
चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या 25 व्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धेत श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डि.जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल, लांजा येथील खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेत शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी पदके जिंकली. कॅडेट गट मुलांमध्ये रुद्र संजय सुर्वे याने सुवर्णपदक मिळवले. तर सय्यद साद साजिद सलीम व भाव्य हरेश पटेल यांनी रौप्य पदके, आणि नैतिक रामेश्वर शेट्ये, राकेश बाळू पवार व श्रेयस समीर सावंत यांनी कांस्य पदके मिळवून शाळेचा लौकिक वाढवला.
स्पर्धा रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने, पुष्कर स्वामी मंगल कार्यालय, चिपळूण येथे झाली. यावेळी व्यंकटेश राव कररा, विश्वदास लोखंडे, लक्ष्मण कररा, शशांत घडशी आणि संजय सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तेजस्विनी आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. पदक विजेत्यांसह भाविन विनोद पटेल, आफताब झहीर कोंडकरी, अब्दुल्ला रईस सय्यद, अर्श म्युझिब कालसेकर, प्रतीक मंगेश कोतवडेकर, साकीब कोंडकरी यांनी सहभाग घेतला.
या सर्व खेळाडूंना संस्थाध्यक्ष आर. डी. सामंत, दीपक कामत, समीक्षा कामत, संजय तेंडुलकर, जितेश गावकर, मुख्याध्यापक उपाध्ये सर, क्रीडाशिक्षक तेजस्विनी आचरेकर, शिक्षकवृंद आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
—
#तायक्वॉंदो #लांजा #क्रीडा #रत्नागिरी #DJसमंतशाळा #Chiplun #SportsNews #TaekwondoChampionship #MaharashtraSports
📸 फोटो
—