पुण्यामध्ये कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुणे: शहरात कौटुंबिक छळामुळे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आंबेगाव पठार परिसरात स्नेहा विशाल झगडे या विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच वैष्णवी हगवणे नामक तरुणीने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केली असताना, आता ही दुसरी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. तिच्या आत्महत्येनंतर माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
या मागणीनंतर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्नेहाचा पती विशाल झगडे, सासरे संजय झगडे, सासू विठाबाई झगडे, दीर विनायक झगडे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा आणि कौटुंबिक छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
#PuneNews #Suicide #DomesticViolence #PuneCrime #BharatiVidyapeethPolice