चिपळूणचे नवे डीवायएसपी प्रकाश बेळे बुधवारी पदभार स्वीकारणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूणचे नवे डीवायएसपी प्रकाश बेळे बुधवारी पदभार स्वीकारणार

37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पदोन्नती; कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम होण्याची आशा

चिपळूण: चिपळूण उपविभागात कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, ३७ वर्षांचा अनुभव असलेले प्रकाश वसंत बेळे (वय ५७) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून नियुक्ती झाली आहे. येत्या बुधवारी ते अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
प्रकाश बेळे यांनी १ नोव्हेंबर १९८८ रोजी मुंबईतील मरोळ येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८३ मध्ये वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. आपल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI), आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. यापूर्वी ते ताडदेव येथे सशस्त्र पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा चिपळूण उपविभागातील कायदा व सुव्यवस्थेचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी होईल अशी अपेक्षा आहे.


#Chiplun #DYSP #PrakashBele #PoliceOfficer #LawAndOrder #MaharashtraPolice #चिपळूण #डीवायएसपी #पोलीस

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...