गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलचा जिल्हास्तरीय गीतं स्पर्धेत गीतगायन स्पर्धेत यश
चिपळूण: (योगेश पेढांबकर)
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मिडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूलच्या मरहूम मोहम्मद शमसुद्दीन खतीब सभागृहात कोशिश फाऊंडेशन जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खदिजा व खातून स्कूलने चतुर्थ क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत एकूण १२ शाळांमधील प्रत्येकी १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये विविध संगीत वाद्यांचा समावेश करण्यात आला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार होऊन प्रेक्षकानी टाळया वाजवून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या यशाबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेसाठी विद्यालयातील शिक्षक श्री. मौलाना अब्दुल रहमान चौगुले, सहाय्यक शिक्षिका कुमारी उमामा चिपळूणकर, तसेच शिक्षक श्री.शक्ती कुमार चव्हाण आदि शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. सदर जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेसाठी प्रेरणास्थान संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.इरफान शेख यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मुजाहिद मेयर व इतर सर्व पदाधिकारी आदीनी केले होते. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर संघटना कायम विविध उपक्रम घेण्यासाठी.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब, व्हा. चेअरमन जफर कटमाले, सेक्रेटरी मुजाहिद मेयर आदि तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उरुसा खतीब, मुख्याध्यापक श्री. इरफान शेख तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले.
#Ratnagiri #SingingCompetition #गीतगायनस्पर्धा #KhadeejaEnglishMedium #KhatunAbdullahSchool #Education #SuccessStory #RatnagiriN